
भूषण ओक
गुजरातमधील राजकोट येथे स्थित असलेली रोलेक्स रिंग्ज ही कंपनी फोर्ज्ड आणि मशिनिंग केलेल्या बेअरिंग रिंग आणि वाहन उद्योगाला लागणाऱ्या सुट्या भागांचे उत्पादन करते. या कंपनीची स्थापना २००३ मध्ये झाली, तर २०२१ मध्ये तिने आयपीओद्वारे शेअर बाजारात प्रवेश केला. कंपनीच्या महसुलात बेअरिंग रिंगचा वाटा ४७ टक्के, तर वाहनांसाठीच्या सुट्या भागांचा वाटा ५३ टक्के आहे आणि महसुलाचा ५२ टक्के वाटा निर्यातीतून, तर बाकी देशांतर्गत पुरवठ्यातून येतो.