मुंबई - ग्रामीण बाजारपेठांमधील मागणीमुळे डिसेंबरमध्ये प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीत मोठी वाढ झाली. डिसेंबरमध्ये प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री वार्षिक २६.६४ टक्क्यांनी वाढून ३,७९,६७१ वर पोहोचली..ग्रामीण भागातील मागणी वार्षिक ३२.४० टक्क्यांनी वाढली, तर शहरी बाजारपेठांमध्ये २२.९३ टक्के वाढ झाली. प्रमुख शहरांच्या पलीकडे ग्रामीण भागातही वैयक्तिक मालकीच्या वाहनांचा वापर वाढत असल्याचे यातून अधोरेखित होते, असे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (फाडा) आज प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे..ग्रामीण भागातील दमदार कामगिरीमुळे २०२५ या वर्षाची सकारात्मक सांगता झाली. कॅलेंडर वर्ष २०२५ मध्ये एकूण प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री ९.७० टक्क्यांनी वाढून ४४,७५,३०९ वर पोहोचली आणि पुन्हा एकदा ग्रामीण बाजारपेठांनी शहरी बाजारपेठेला मागे टाकले.संपूर्ण वर्षासाठी, ग्रामीण भागातील प्रवासी वाहनांची विक्री १२.३१ टक्क्यांनी वाढली, तर शहरी भागांमध्ये ८.०८ टक्के वाढ झाली. कॅलेंडर वर्ष २०२५ मध्ये सर्व श्रेणींमधील एकूण रिटेल वाहनविक्री २,८१,६१,२२८ इतकी झाली, त्यात वार्षिक आधारावर ७.७१ टक्क्यांनी वाढ झाली..डिसेंबर महिन्यात वर्षाचा शेवट दमदार झाला, एकूण वाहनांची रिटेल विक्री वार्षिक १४.६३ टक्क्यांनी वाढून २०,२८,८२१ वर पोहोचली. प्रवासी वाहनांसोबतच, व्यावसायिक वाहनांनी २४.६० टक्के, तीन-चाकी वाहनांनी ३६.१० टक्के, दुचाकी वाहनांनी ९.५० टक्के आणि ट्रॅक्टर विभागाने १५.८० टक्क्यांनी वाढ नोंदवली, तर बांधकाम उपकरणांच्या विक्रीत १८.५४ टक्के घट झाली..नववर्षात उत्तम वाढीची अपेक्षाजानेवारी २०२६साठी ७०.४८ टक्के डीलरना विक्रीवाढीची अपेक्षा आहे. संक्रांतीनंतर आणि लग्नसराईच्या हंगामात ही गती वाढण्याची शक्यता आहे. जानेवारी-मार्च तिमाहीत ७४.९१ टक्के वाढीची अपेक्षा आहे.सणासुदीची मागणी, वर्षअखेरीची खरेदी आणि ग्रामीण भागातील सातत्यपूर्ण मागणीचा आधार मिळेल, असे ‘फाडा’ने म्हटले आहे. त्याच वेळी, वित्तपुरवठ्यासाठी लागणारा वेळ आणि मागणी असलेल्या मॉडेलची उपलब्धता या प्रमुख बाबींवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचेही ‘फाडा’ने नमूद केले आहे..वाहन उद्योगासाठी २०२५ वर्ष दोन भागांमध्ये विभागलेले होते, केंद्रीय अर्थसंकल्पातील थेट करसवलत आणि २०२५ दरम्यान आरबीआयने केलेल्या एकत्रित व्याजदर कपातीसारख्या अनुकूल संकेत असूनही जानेवारी ते ऑगस्ट हा काळ मंदीचा राहिला. तर, जीएसटी सुधारणांमुळे सप्टेंबरपासून मागणी वाढली.- सी. एस. विघ्नेश्वर, अध्यक्ष, फाडा.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.