

Section 54F: Claim Full LTCG Exemption on Selling Shares/M.F. for a New House
E sakal
डॉ. दिलीप सातभाई
dvsatbhaiandco@gmail.com
प्राप्तिकर कायद्याच्या कलम ५४एफनुसार निवासी घराव्यतिरिक्त इतर कोणत्याही भांडवली मालमत्तेची म्हणजे शेअर्स, म्युच्युअल फंड आदींची विक्रीपश्चात मिळालेली १० कोटी रुपयांपर्यंतची (दीर्घकालीन लाभ नाही) रक्कम नवे निवासी घर खरेदी करण्यासाठी वा बांधण्यासाठी वापरल्यास संपूर्ण दीर्घकालीन लाभ करमुक्त असतो.
प्राप्तिकर कायद्याच्या कलम ५४एफनुसार एखाद्या व्यक्तीने किंवा हिंदू अविभक्त कुटुंबाने (एचयूएफ) शेअर्स, म्युच्युअल फंड, सोने सोडून आदींची विक्रीपश्चात मिळालेली रक्कम ही नवे घर घेण्यासाठी वापरली तर संपूर्ण दीर्घकालीन लाभ करमुक्त असतो.
तथापि, ही रक्कम विक्रीच्या तारखेपासून दोन वर्षांच्या आत किंवा मालमत्तेच्या विक्रीच्या एका वर्षाच्या अगोदर किंवा करदात्याने बांधकामाधीन मालमत्ता किंवा स्वतः बांधकाम करण्याचा पर्याय निवडला असेल तर मालमत्तेच्या विक्रीच्या तारखेपासून तीन वर्षांत निवासी घर बांधकाम करण्यात गुंतवली गेली असेल तर संपूर्ण दीर्घकालीन लाभ करमुक्त होईल.
जर खरेदी रक्कम १० कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल, तर खरेदीची रक्कम फक्त १० कोटी रुपयेच मानली जाईल, अशा स्पष्ट तरतुदी आहेत. हा बदल एक एप्रिल २०२४ पासून लागू आहे. जर निव्वळ विक्रीची रक्कम पूर्णपणे गुंतवली गेली नसेल, तर सूट विक्रीच्या रक्कमेच्या टक्केवारीवर प्रमाणानुसार उपलब्ध असेल.