Share Market: शेअर, म्युच्युअल फंड व्यवहार थेट प्राप्तिकर विवरणपत्रात!

New ITR Facility to Simplify Share and Mutual Fund Tax Filing: शेअर बाजार, म्युच्युअल फंड, प्राप्तिकर विवरणपत्र, आयटीआर फाइलिंग, गुंतवणूकदार
Stock Market Investments and Mutual Fund Transactions to Appear in Income Tax Returns Simplifying Tax Filing Process

Stock Market Investments and Mutual Fund Transactions to Appear in Income Tax Returns Simplifying Tax Filing Process

sakal

Updated on: 

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत असताना भांडवली लाभाची अचूक गणना करणे हे प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यातील महत्त्वाचे आणि गुंतागुंतीचे काम बनले आहे. एकाच कंपनीचे शेअर वेगवेगळ्या वेळी खरेदी-विक्री करणे, बोनस शेअर मिळणे, म्युच्युअल फंड युनिटची पूर्तता आणि अनेक डी-मॅट खात्यांमधील व्यवहार यांमुळे मोठ्या प्रमाणात माहिती संकलित करावी लागते. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने १० सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या दोन अधिसूचनांद्वारे शेअर व म्युच्युअल फंड व्यवहारांची माहिती प्राप्तिकर विवरणपत्रातील भांडवली लाभाच्या अनुसूचीत आधीच भरून देण्याची सुविधा दिली आहे. मात्र, विवरणपत्रातील माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याची जबाबदारी करदात्याचीच आहे. त्यामुळे सर्व संबंधित विवरणपत्रे व व्यवहारांची पडताळणी करूनच प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...