adani group cfo clarifies all margin loans of promoters fully paid reject ken report
adani group cfo clarifies all margin loans of promoters fully paid reject ken report Sakal

Adani Group : अदानी समुहाला मोठा झटका, आता कर्जाच्या परतफेडीवर प्रश्नचिन्ह, कंपन्यांच्या शेअर्समध्ये...

अदानी समूहाने कर्ज परतफेडीबाबतच्या अहवालात उपस्थित केलेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण दिले आहे.

Adani Group : गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने कर्ज परतफेडीबाबतच्या अहवालात उपस्थित केलेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण दिले आहे. स्टॉक एक्स्चेंजला उत्तर देताना, समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) जुगशिंदर सिंग यांनी केनचा अहवाल पूर्णपणे नाकारला.

यासोबतच त्यांनी दावा केला आहे की, अदानी समूहाने प्रवर्तकांची सर्व कर्जे पूर्णपणे फेडली आहेत. मंगळवारी द केनने अदानी समूहाने केलेल्या कर्जाच्या परतफेडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा अहवाल प्रकाशित केला होता. (adani group cfo clarifies all margin loans of promoters fully paid reject ken report)

यामध्ये अदानी समूहाने 2.15 अब्ज डॉलर्सचे कर्ज खरोखरच फेडले आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यात पुढे म्हटले आहे की कर्जाच्या परतफेडीचा हा दावा असूनही, नियामक फाइलिंग दर्शविते की बँकांनी अद्याप तारण ठेवलेल्या स्टॉकचा मोठा भाग बँकांकडे आहे. याचा संदर्भ देत कर्जाची पूर्ण परतफेड झाली नसल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. असे वृत्त हिंदुस्थान टाईम्सने दिले आहे.

स्टॉक एक्स्चेंजने मागितले स्पष्टीकरण :

या अहवालाच्या आधारे स्टॉक एक्स्चेंजने अदानी समूहाकडून स्पष्टीकरण मागवले होते. एनएसईच्या वतीने समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसकडून स्पष्टीकरण मागितले असता, कंपनीच्या उत्तराची प्रतीक्षा असल्याचे सांगण्यात आले.

एक्सचेंजने स्पष्टीकरण मागितल्याच्या बातम्यांचा अदानी कंपनीच्या शेअर्सवर परिणाम झाला. मंगळवारी व्यवहार संपल्यावर गौतम अदानी यांच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स लाल चिन्हावर बंद झाले. यापैकी पाच स्टॉकमध्ये अप्पर सर्किट बसवण्यात आले.

अदानी समूहाने दिले उत्तर :

स्टॉक एक्स्चेंजने मागितलेल्या स्पष्टीकरणावर अदानी समूहाकडून मंगळवारी संध्याकाळी उशिरा उत्तर आले. समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी जुगशिंदर सिंग यांनी हा अहवाल दिशाभूल करणारा असल्याची टीका केली.

कर्जाच्या परतफेडीबाबत प्रश्न उपस्थित करणारा अहवाल त्यांनी फेटाळून लावला. सिंग यांनी ट्विटद्वारे सांगितले की, चालू तिमाहीच्या शेवटी तारण ठेवलेल्या शेअर्सशी संबंधित डेटा अपडेट केला जाईल. त्यांनी पुढे लिहिले की प्रवर्तकांची सर्व कर्जाची पूर्ण परतफेड झाली आहे.

adani group cfo clarifies all margin loans of promoters fully paid reject ken report
Instant Personal Loan : इंस्टंट पर्सनल लोनचे 4 फायदे जे आपत्कालीन परिस्थितीसाठी अतिशय योग्य आहेत

अदानी समूहाच्या शेअर्सची अवस्था :

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मंगळवारी लोअर सर्किट होते त्या शेअर्समध्ये अदानी पॉवर (5.00%), अदानी विल्मर (4.99%), अदानी ग्रीन एनर्जी (5.00%), अदानी टोटल गॅस (5.00%) आणि अदानी ट्रान्समिशन लिमिटेड (5.00%) यांचा समावेश होता.

त्याच वेळी, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 6.97 टक्क्यांनी घसरून बंद झाले. समूहाच्या इतर शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर, अदानी पोर्ट्स 5.18%, NDTV 4.78%, अंबुजा सिमेंट्स 2.97% आणि ACC Ltd चे शेअर्स 4.45% ने घसरले.

adani group cfo clarifies all margin loans of promoters fully paid reject ken report
जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com