Adani Shares Crash : हिंडेनबर्गची भविष्यवाणी खरी ठरली; अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये 85% घसरण, आता होणार... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam Adani

Adani Shares Crash : हिंडेनबर्गची भविष्यवाणी खरी ठरली; अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये 85% घसरण, आता होणार...

Adani Shares Crash : अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे. हिंडेनबर्गचा अहवाल 24 जानेवारी 2023 रोजी आला. हिंडेनबर्गने म्हटले होते की, अदानी समूहाचे सात शेअर्स सुमारे 85 टक्क्यांनी घसरले आहेत.

या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये लोअर सर्किट गेले आहेत. अदानी समूहाचे सर्व शेअर्स लाल चिन्हावर आले होते. गेल्या एका महिन्यात अदानी समूहाचे तीन शेअर्स 85 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत.

अदानी समूहाचा आणखी एक शेअरही 79 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. अदानी समूहाच्या कोणत्या शेअर्समध्ये किती घसरण झाली ते जाणून घेऊयात.

अदानी समूहाचे 'हे' शेअर्स घसरले :

अमेरिकन रिसर्च फर्मचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. गेल्या एका महिन्यात हे शेअर्स 85 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

अदानी समूहाच्या सर्व 10 कंपन्यांचे शेअर्सचे भाव सातत्याने घसरत आहेत. अदानी टोटल गॅसचे शेअर्स 25 जानेवारीपासून सातत्याने घसरत 835 रुपयांवर बंद झाले आहेत. हिंडेनबर्गने अहवालात अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सचे अतिमूल्यांकन केल्याचा आरोप केला होता.

24 जानेवारीपासून अदानी टोटल गॅसच्या बाजारमूल्यात 3.35 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. 4.3 लाख कोटी रुपयांवरून, त्याचे मार्केट कॅप आता 1 लाख कोटी रुपयांवरून 91,829 कोटी रुपयांवर आले आहे.

'या' शेअरमध्ये 82 टक्क्यांनी घसरण :

बीएसईच्या आकडेवारीनुसार बुधवारी अदानी ग्रीनचा शेअर 539 रुपयांवर बंद झाला होता. गुरुवारी तो घसरणीसह 512.10 रुपयांवर उघडला. शेअरमध्ये लोअर सर्किट दिसून येत आहे.

अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 82% खाली आहे. त्याच बरोबर, अदानी ट्रान्समिशनचा शेअर ही 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 81% खाली आहे.

काल अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण :

शेअर बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये काल म्हणजेच बुधवारी मोठे नुकसान झाले. BSE वर अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 10.43 टक्क्यांनी घसरून 1,404.85 रुपयांवर बंद झाले.

अदानी पोर्ट्सचे शेअर्स 6.25 टक्क्यांनी, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅसचे शेअर्स 5 टक्क्यांनी खाली आले. अदानी ग्रीन एनर्जी 4.99 टक्के, अदानी विल्मार 4.99 टक्के आणि अंबुजा सिमेंट्स 4.92 टक्क्यांनी घसरले. NDTV 4.13 टक्क्यांनी शेअर्स घसरले.