Delhivery च्या शेअर्समध्ये तेजी, ब्लॉक डीलमुळे वाढतायत शेअर्स...

या ब्लॉक डीलद्वारे डेल्हिवरीचे 1.2 कोटी शेअर्सचा व्यवहार झाल्याचे दिसून आले आहे.
Delhivery
Delhiverysakal

Delhivery Shares : लॉजिस्टिक कंपनी डेल्हिवरी लिमिटेडच्या (Delhivery) शेअर्समध्ये मंगळवारी 3.5 टक्क्यांची वाढ झाली. शेवटी एनएसई हा वर शेअर 0.93 टक्क्यांनी वाढून 331 रुपयांवर बंद झाला. या वाढीमागे एक कारण आहे.

कंपनीच्या शेअर्समध्ये 388 कोटींहून अधिक रुपयांची ब्लॉक डील झाली असून, त्यानंतर यात मोठी तेजी आली आहे. या ब्लॉक डीलद्वारे डेल्हिवरीचे 1.2 कोटी शेअर्सचा व्यवहार झाल्याचे दिसून आले आहे. (Delhivery Shares increased due to block deal )

ही डील एकूण 388.15 कोटी रुपयांना झाला आहे. मार्चच्या सुरुवातीला, जपानी टेक्नोलॉजी कंपनी सॉफ्टबँकने डेल्हिवरीमधील आपला 3.8 टक्के हिस्सा 954 कोटी रुपयांना विकला.

बीएसईवरील ब्लॉक डील डेटावरून असे दिसून आले आहे की सॉफ्टबँकची शाखा एसव्हीएफ डोअरबेलने (Cayman) आठ ट्रान्झॅक्शनमध्ये डेल्हिवेरीचे 2.8 कोटी शेअर्स सरासरी 340.8 रुपये प्रति शेअर या किमतीना विकले.

Delhivery
Dividend stocks: गुंतवणूकदारांची होणार चांदी; 'या' आठवड्यात 6 कंपन्याची एक्स-डिव्हिडंड डेट, जाणून घ्या

यूएस-बेस्ड फर्म टायगर ग्लोबलने मार्चमध्ये डेल्हिवरीमधील 0.75 टक्के हिस्सेदारी 321 रुपयांच्या सरासरी किंमतीला 177 कोटी रुपयांना विकले. त्याच्या आधीच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्येही कंपनीने कंपनीतील 1.7 टक्के हिस्सा विकला होता. डिसेंबर तिमाहीत डेल्हिवरीमध्ये त्यांचा एकूण 4.68 टक्के हिस्सा होता.

अशात क्रेडिट सुइसने 500 रुपयांच्या टारगेटसह स्टॉकवर 'आउटपरफॉर्म' रेटिंग दिले होते. ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने 440 रुपयांच्या टारगेटसह 'बाय' रेटिंग कायम ठेवले आहे.

Delhivery
Stock Market : 1 रुपयाच्या Hindustan Foods स्टॉकने बनवले कोट्यधीश, कसे ते जाणून घेऊयात...

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com