Pharma Share : या औषध बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये येत्या काळात तेजीचा तज्ज्ञांना विश्वास...

ही कंपनी प्रोसेस रिसर्च आणि डेव्हलपमेंटपासून ते क्लिनिकल आणि कमर्शियल मॅन्युफॅक्चरिंग आणि इनोव्हेटर फार्मास्युटिकल कंपन्यांन एपीआयचा सप्लाय करण्यापर्यंत सगळ्यात गुंतलेली आहे.
Pharma Share
Pharma Sharesakal

Pharma Share : डिशमन कार्बोजेन एम्सिस (Dishman Carbogen Amcis) या औषध कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारी मोठी तेजी पाहायला मिळाली. इंट्रा-डेमध्ये हा शेअर 14 टक्क्यांपर्यंत चढला. त्यानंतर तो 11.79 टक्क्यांनी वाढून 121.40 रुपये प्रति शेअरवर बंद झाला. त्याच वेळी, गेल्या 11 ट्रेडींग दिवसांमध्ये त्याचे शेअर्स सुमारे 51 टक्क्यांनी वाढलेत.

ही एक इंटीग्रेटेड CRAMS (कॉन्ट्रॅक्ट रिसर्च अँड मॅन्युफॅक्चरिंग) कंपनी आहे. ही कंपनी प्रोसेस रिसर्च आणि डेव्हलपमेंटपासून ते क्लिनिकल आणि कमर्शियल मॅन्युफॅक्चरिंग आणि इनोव्हेटर फार्मास्युटिकल कंपन्यांन एपीआयचा सप्लाय करण्यापर्यंत सगळ्यात गुंतलेली आहे. (Dishman Carbogen Amcis Ltd a global outsourcing partner for the pharmaceutical industry)

Pharma Share
Multibagger Stock : हा शेअर घसरत असल्याने स्टॉक विकण्याचा शेअर मार्केट तज्ज्ञांचा सल्ला...

कंपनीचा व्यवसाय स्वित्झर्लंड, यूके, फ्रान्स, नेदरलँड्स, भारत आणि चीनमध्ये पसरलेला आहे. डिशमॅन एंड-टू-एंड इंटिग्रेटेड हाय-व्हॅल्यू CRAMS ऑफर करते. ज्यात एपीआय, हाय पॉटेंट एपीआय, इंटरमीडिएट्स, फेज ट्रान्सफर कॅटॅलिस्ट्स, व्हिटॅमिन डी ऍनालॉग्स, कोलेस्ट्रॉल, लॅनोलिन संबंधित प्रॉडक्ट्स, अँटिसेप्टिक आणि डिस-इन्फेक्टंट फॉर्म्युलेशनचा समावेश आहे.

डिशमन कार्बोजेन एम्सिसचे शेअर्स गेल्या एका वर्षात 28 टक्क्यांनी घसरले आहेत. दुसरीकडे, गेल्या 6 महिन्यांबद्दल बोलायचे तर त्याची कामगिरी सपाट आहे. या वर्षात आतापर्यंत स्टॉकमध्ये जवळपास 26 टक्क्यांची वाढ झाली आहे. 5 एप्रिल 2022 रोजी या शेअरने 52 आठवड्यांच्या उच्चांकाला म्हणजेच 201 रुपयांना स्पर्श केला आणि आतापर्यंत 38 टक्के करेक्शन आले आहे. त्याचा विक्रमी उच्चांक 397 रुपये आहे, जो 25 जानेवारी 2018 रोजी पोहोचला.

Pharma Share
Multibagger Stock : हा शेअर घसरत असल्याने स्टॉक विकण्याचा शेअर मार्केट तज्ज्ञांचा सल्ला...

आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत, कंपनीचा कंसोलिडेटेड नेट प्रॉफिट 32.7 टक्क्यांनी वाढून 46.96 कोटी झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत 35.38 कोटी नेट रेव्हेन्यू 13.8 टक्क्यांनी वाढून 639.8 कोटीवर पोहोचला, जो मागील वर्षीच्या तिमाहीत 562.08 कोटी होता.

Pharma Share
Profitable Share To Buy : घसरणीत 'हा' शेअर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, तज्ज्ञांचा विश्वास..

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com