Multibagger Stock Tips: 'या' Smallcap Stockची कमाल, 6 महिन्यात 1 लाखाचे 25 लाख l Eyantra Ventures Smallcap Stock share market | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smallcap Multibagger Stock Tips

Multibagger Stock: 'या' Smallcap Stockची कमाल, 6 महिन्यात 1 लाखाचे 25 लाख...

Eyantra Ventures Smallcap Stock : शेअर बाजारात स्मॉल-कॅप स्टॉक्सना अतिशय धोकादायक मानले जाते. शेअर मार्केट एक्सपर्ट्स कायमच गुंतवणूकदारांना अशा शेअर्सपासून दूर राहण्याचा सल्ला देत असतात.

पण एखाद्या गुंतवणूकदाराने चांगल्या फंडामेंटल असणाऱ्या स्मॉल-कॅप स्टॉकवरमध्ये पैसे गुंतवले तर या शेअर्समधूनही नफा कमावण्याची चांगली संधी असते.

ईयंत्रा व्हेंचर्सचा (Eyantra Ventures) स्टॉक यासाठी एक चांगले उदाहरण आहे. या स्टॉकने गेल्या 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे 25 लाख केले आहेत.

इयंत्रा व्हेंचर्सचे शेअर्स शुक्रवारी 86.15 रुपयांवर बंद झाले, शिवाय बीएसईवर 5 टक्क्यांचे अपर सर्किट लागले. पण 6 महिने आधी म्हणजे 5 सप्टेंबर 2022 रोजी, त्याचे शेअर्स बीएसईवर केवळ 3.43 रुपयांच्या किमतीवर होते. म्हणजेच गेल्या 6 महिन्यांत या शेअरची किंमत सुमारे 2,411.66% वाढली आहे.

इयंत्रा व्हेंचर्सच्या शेअर्समध्ये गेल्या एक महिन्यापासून जवळपास दररोज 5% अपर सर्किट लागत आहे. यामुळे गेल्या एका महिन्यात या शेअरची किंमत सुमारे 162.65% नी वाढली आहे.

याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने एक महिन्यापूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 2.62 लाख झाले असते.

कंपनी काय करते ?

इयंत्रा व्हेंचर्स आधी पुनीत कमर्शियल म्हणून ओळखले जात होते. ही जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रातील एक स्मॉल कॅप कंपनी असून तिचे बाजार मूल्य फक्त 12.41 कोटी रुपये आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते.

त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.