Defence Stock : 'या' डिफेन्स स्टॉकमध्ये येईल घसरण, शेअर्स विकण्याचा तज्ज्ञांचा सल्ला l Garden Reach Shipbuilders & Engineers Defence Stock | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Defence Stock

Defence Stock : 'या' डिफेन्स स्टॉकमध्ये येईल घसरण, शेअर्स विकण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Garden Reach Shipbuilders & Engineers Defence Stock : गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (Garden Reach Shipbuilders & Engineers) या कमर्शियल आणि नौदलाच्या जहाजांच्या निर्मिती आणि दुरुस्तीमध्ये गुंतलेल्या कंपनीचे शेअर्स सध्या चांगली कामगिरी करत आहेत. सध्या बाजारात अतिशय अस्थिरतेचे वातावरण आहे. सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला, पण या घसरणीच्या वातावरणात गार्डन रिच शिपबिल्डर्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

गार्डन रीच 1.14 टक्क्यांच्या वाढीसह 422.95 रुपयांवर बंद झाला. पाच वर्षांपूर्वी, 5 ऑक्टोबर 2018 रोजी, त्याचे शेअर्स 118 रुपयांना लिस्ट झाले होते. म्हणजेच सध्याच्या किंमतीनुसार आयपीओ गुंतवणूकदार 259 टक्के नफ्यात आहे. पण बाजारातील तज्ज्ञ गुंतवणूकदारांना आता नफा बुक करण्याचा सल्ला देत आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने त्यांचे शेअर्स 9 टक्क्यांनी घसरू शकतात असा अंदाज वर्तवला आहे.

कॉम्पिटिटीव्ह बिडिंगद्वारे जिंकलेल्या ऑर्डरमुळे डिसेंबर तिमाहीत कंपनीचे एबिटदा मार्जिन कमी होते. या आर्थिक वर्ष 2022-23 च्या अखेरीस गार्डन रीचची ऑर्डर बुक 25 हजार कोटींपर्यंत पोहोचण्याची आशा आहे, जी डिसेंबर 2022 अखेरीस 22,240 कोटी रुपये होती. सध्याची ऑर्डरबुक FY2024 पर्यंत पूर्ण होईल. कंपनीसाठी पुढे अनेक संधी आहेत, पण ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या मते, आर्थिक वर्ष 2025 मध्ये कॅश जनरेशन पीकवर पोहोचू शकते. या सर्व कारणांमुळे, ब्रोकरेज फर्मने गार्डन रीचचे रेटींग अपग्रेड केले आहे, पण टारगेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही, अर्थात 385 रुपये टारगेट निश्चित केले आहे. म्हणजेच किमान 9 % हे शेअर्स खाली येऊ शकतात असा याचा अर्थ आहे.

मागील वर्षी 24 फेब्रुवारी 2022 रोजी गार्डन रीचचे शेअर्स 199 रुपयांवर होते, जे एका वर्षातील नीचांकी आहे. यानंतर, शेअर्सने रिकव्हर करत 10 महिन्यांत 9 डिसेंबर 2022 रोजी 556.80 रुपयांपर्यंत मजल मारली. पण त्यानंतर ते सुमारे 24 टक्क्यांनी घसरले. यामध्ये आणखी 9 टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज बाजार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.