Hindustan Aeronautics चे शेअर्स डिस्काउंटवर खरेदी करण्याची संधी, सरकारने वाढवली ऑफर साइज

त्यामुळेच वित्त मंत्रालयाने गुरुवारी ग्रीन शू ऑप्शनला मान्यता दिली.
Hindustan Aeronautics
Hindustan Aeronauticssakal

Hindustan Aeronautics : एअरोस्पेस आणि डिफेन्स सेक्टरमधील दिग्गज कंपनी हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडचे (HAL) शेअर्स बाजारात वेगाने वाढत आहेत. पण तुम्ही हे शेअर्स ओएफसद्वारे 4% डिस्काउंटवर खरेदी करू शकता. एचएएलच्या ऑफर फॉर सेलला (OFS) मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर सरकारने आता ग्रीन शू ऑप्शनचा निर्णय घेतला आहे.

ग्रीन शू ऑप्शन म्हणजे पूर्व-निर्धारित इश्यू साइजपेक्षा जास्त शेअर्स ठेवण्याचा ऑप्शन ठेवणे. एचएएलच्या ओएफएसला पहिल्या दिवशी 4.5 पट सबस्क्रिप्शन मिळाले, त्यामुळेच वित्त मंत्रालयाने गुरुवारी ग्रीन शू ऑप्शनला मान्यता दिली.

हा ऑप्शन वापरल्यानंतर सरकार आता हिंदुस्थान एरोनॉटिक्सचे अधिक शेअर्स विकू शकणार आहे. पहिल्या दिवशी नॉन-रिटेल गुंतवणूकदारांनी मजबूत कल दाखवला, त्यामुळे ग्रीन शू पर्याय वापरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ट्विट दिपमचे सेक्रेटरी तुहिन कांता पांडे यांनी केले.

Hindustan Aeronautics
Hindustan Aeronautics: शेअर्समध्ये मोठी तेजी, स्ट्रॉन्ग ऑर्डर बूकमुळे आणखी होणार वाढ

सरकारने बुधवारी जास्तीत जास्त 3.5 टक्के हिस्सा विकण्याचा प्रस्ताव ठेवला होता. बेस साइज अंतर्गत हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या ऑफर फॉर सेलसाठी सरकारने त्यांचा 1.75 टक्के हिस्सा विक्रीसाठी ठेवला होता.

या अंतर्गत आधी 58.51 लाख शेअर्स विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. मात्र, आता ग्रीन शू पर्यायाच्या निर्णयानंतर त्याचे आणखी 58.5 लाख शेअर्स उपलब्ध झाले आहेत. याचा अर्थ सरकार एचएएलचे 1.17 लाख शेअर्स विकणार आहे. गुरुवारी हा इश्यू केवळ नॉन-रिटेल गुंतवणूकदारांसाठी खुला होता आणि आता आज रिटेल गुंतवणूकदारांनीही यात गुंतवणूक करु शकतात.

Hindustan Aeronautics
Tata Electric Cars Discount : 'या' इलेक्ट्रॉनिक कारवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, लगेच घ्या संधीचा फायदा

या इश्यूसाठी फ्लोअर प्राइस 2450 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे, जी सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 4% डिस्काउंटवर मिळत आहे. एचएएलचे शेअर्स सध्या बीएसई 2553.30 रुपयांवर आहेत. पण ओएफएसच्या पहिल्या दिवशी एचएएलचे शेअर्स 4.87 टक्क्यांनी घसरून 2497.40 रुपयांवर बंद झाल होते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com