इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (इंडिया) (International Gemmological Institute) ही ब्लॅकस्टोनच्या मालकीची कंपनी आपला आयपीओ लॉन्च करणार आहे. कंपनीने यासाठी बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे. .पब्लिक इश्यूद्वारे 4000 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. या आयपीओअंतर्गत 1250 कोटीचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील. याशिवाय 2750 कोटीचे शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) विकले जातील.ओएफएसचा भाग म्हणून इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (इंडिया) चे एकमेव प्रमोटर BCP एशिया II टॉपको प्रा.लि.द्वारे शेअर्स विकले जातील. ॲक्सिस कॅपिटल, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, मॉर्गन स्टॅनले इंडिया कंपनी आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत..Tata Sons IPO: गुंतवणूकदारांची मोठी निराशा! टाटा सन्सचा IPO येणार नाही? RBIच्या नियमांचे काय होणार?.आयजीआय ही भारतातील सर्वात मोठी इंडिपेंडेंट सर्टिफिकेशन आणि मान्यता सर्विस प्रोवायडर आहे. CY2023 मध्ये हिरे, सेट ज्वेलरी आणि रंगीत स्टोनसाठी प्रमाणपत्रांच्या संख्येनुसार IGI चा बाजारातील हिस्सा अंदाजे 50 टक्के आहे. BCP Asia II Topco Pvt Ltd च्या प्रमोटर्सकडून IGI बेल्जियम ग्रुप आणि IGI नेदरलँड्स ग्रुपचे अधिग्रहण करण्यासाठी आयपीओ उत्पन्नातील 1,100 कोटी वापरण्याचा कंपनीचा मानस आहे. शिवाय, उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी खर्च केली जाईल.BCP Asia II Topco Private Limited ही IGI बेल्जियम आणि IGI नेदरलँड्सची 100 टक्के भागधारक आहे, जी त्यांच्या संबंधित उपकंपन्यांसह भारत आणि तुर्कीच्या बाहेर IGI व्यवसाय चालवतात..Swiggy IPO : स्विगी आणणार या वर्षीचा सर्वात मोठा आयपीओ?.IGI India नैसर्गिक हिरे, लेबोरेटरी ग्रोन डायमंड्स, सेट ज्वेलरी आणि रंगीत स्टोनचे सर्टीफिकेशन आणि मान्यता तसेच एजुकेशनल प्रोग्राम ऑफर करते. डायमंड कटिंग आणि पॉलिशिंगसाठी भारत हे जगातील सर्वात मोठे केंद्र आहे. CY23 मध्ये व्हॉल्यूमनुसार जगातील एकूण पॉलिश्ड हिऱ्यांपैकी 95 टक्के भारताचा वाटा होता. त्याची बाजारात कोणतीही लिस्टेड संस्था नाही.नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.