
Share Market Tips : 'ही' पॉवर कंपनी देणार तगडा रिटर्न, तुम्हाला माहिती आहे का?
Share Market Tips : शेअर बाजारात सध्या अतिशय अस्थिर वातावरण असतानाही काही शेअर्सवर त्याचा परिणाम झालेला नाही. अशाच शेअर्समध्ये सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनी कल्पतरू पॉवर ट्रान्समिशनच्या शेअर्सची गणना होते.
लाँग टर्म असो वा शॉर्ट टर्म कल्पतरु पॉवर ट्रान्समिशनच्या शेअर्सने त्यांच्या गुंतवणूकदारांना कायमच दमदार परतावा दिला आहे. (Kalpataru Power Transmission Limited Power Company shares : share market news)
आता तर शेअर मार्केट एक्सपर्ट्सना यात आणखी मोठा ट्रेंड दिसत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म शेअरखानने यामध्ये गुंतवणुकीसाठी 695 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे, जे सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 21 टक्क्यांनी जास्त आहे. कंपनीचे शेअर्स सध्या बीएसईवर 2.38 टक्क्यांनी वाढून 576.50 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेगमेंट्समध्ये टर्नकी प्लेयर आहे, म्हणजे ही कंपनी एंड-टू-एंड सेवा देते. त्यांच्या ऑर्डर बुकमध्ये वार्षिक 46% वाढ झाली आहे आणि पुढील काळात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून मजबूत ऑर्डर मिळण्याची आशा आहे.
कंपनीचे मार्जिन आर्थिक वर्ष 2024 मध्ये वाढेल असा विश्वास ब्रोकरेज फर्मने व्यक्त केला आहे. याव्यतिरिक्त, कल्पतरू आणि जेएमसी प्रोजेक्ट्सच्या विलीनीकरणामुळे कल्पतरूचे मार्केट वाढले आहे.
कंपनीने आर्थिक वर्ष 2025 मध्ये 24 हजार कोटी रुपयांचे रेव्हेन्यू टारगेट निश्चित केले आहे. ऑपरेटिंग कामगिरीमध्ये सुधारणा आणि नॉन-कोअर एसेट्सच्या विक्रीद्वारे कर्जात घट आणि वर्किंग कॅपिटलमध्ये सुधारणा होण्याची कंपनीला विश्वास आहे.
या सर्व कारणांमुळे, ब्रोकरेज फर्म शेअरखानने त्यावर बाय रेटिंग कायम ठेवलीत 695 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे.
कल्पतरू पॉवरचे शेअर्स 13 मार्च 2003 रोजी फक्त 3.28 रुपयांना होते, जे आता 17476 टक्क्यांनी वाढून 576.50 रुपयांवर पोहोचले आहेत.
म्हणजेच कल्पतरू पॉवरने 20 वर्षांत केवळ 57,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते.
त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.