Share Market : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी 'हे' नियम बदलणार; जाणून घ्या एका क्लिकवर

पुढील महिन्यापासून म्हणजे एप्रिल 2023 पासून, तुम्हाला बरेच बदल पाहायला मिळणार आहेत.
Share Market
Share MarketSakal

New Rules From 1st April 2023 : पुढील महिन्यापासून म्हणजे एप्रिल 2023 पासून, तुम्हाला बरेच बदल पाहायला मिळणार आहेत. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यामुळे शेअर बाजारापासून ते तुमच्या आर्थिक व्यवहारात अनेक नियम बदलत आहेत.

अनेक नवे नियम लागू केले जात आहेत, ज्यांची माहिती तुम्हाला असणे गरजेच आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत नियम बदलण्यात आले आहते, जसे की वित्त विधेयक 2023 मध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. कोणते नियम बदलले आहेत ते जाणून घ्या.

1. डेट म्युच्युअल फंड (Debt Mutual Fund) मध्ये LTCG कर लाभ मिळणारा नाही

डेट म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही फायद्याची मानली जात होती. परंतु शुक्रवारी लोकसभेत मंजूर झालेल्या वित्त विधेयकात ते LTCG म्हणजेच दीर्घकालीन भांडवली नफ्याच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे.

इक्विटीमध्ये कमी गुंतवणूक करणाऱ्या डेट म्युच्युअल फंडांना दीर्घकालीन कर लाभ न देण्याचा प्रस्ताव आहे. आता डेट फंड जे त्यांच्या मालमत्तेच्या 35 टक्क्यांपेक्षा कमी इक्विटीमध्ये गुंतवणूक करतात त्यांना दीर्घकालीन कर लाभ नाकारला जाऊ शकतो.

यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होईल. अशा म्युच्युअल फंड योजनांचे गुंतवणूकदार जे त्यांच्या मालमत्तेपैकी 35 टक्के इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करतात त्यांना त्यांच्या स्लॅबनुसार कर आकारला जाईल.

Share Market
LPG Subsidy : उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी, केंद्र सरकारने...

2. NSE वरील व्यवहार शुल्कातील 6% वाढ मागे :

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) ने 1 एप्रिलपासून रोख इक्विटी आणि फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंटमधील व्यवहार शुल्कातील सहा टक्के वाढ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त शुल्क 1 जानेवारी 2021 पासून लागू झाले होते.

त्या वेळी बाजारातील काही अत्यावश्यकता लक्षात घेऊन वाढ करण्यात आली होती. NSE ने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की त्यांच्या संचालक मंडळाने गुरुवारी झालेल्या बैठकीत व्यवहार शुल्कातील सहा टक्के वाढ मागे घेण्याचा निर्णय घेतला.

3. डीमॅट खाते फ्रीज केले जाऊ शकते :

डिमॅट खात्यांच्या संदर्भात, नॉमिनीची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे. या मुदतीपर्यंत तुम्ही नॉमिनी न केल्यास, डेबिटसाठी ट्रेडिंग आणि डिमॅट खाती गोठवली जातील. सेबीच्या नियमांनुसार, ज्यांच्याकडे डिमॅट आणि ट्रेडिंग खाते आहे त्यांनी 31 मार्च 2023 पर्यंत नॉमिनीच्या नावाची नोंदणी करणे अनिवार्य आहे.

Share Market
एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com