Olectra Greentech Share : ओलेक्ट्रा ग्रीनटेकच्या शेअर्समध्ये तेजी, आणखी वाढीचा अंदाज l Olectra Greentech Share market stock hick | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Olectra Greentech Share

Olectra Greentech Share : ओलेक्ट्रा ग्रीनटेकच्या शेअर्समध्ये तेजी, आणखी वाढीचा अंदाज

Olectra Greentech Share : ओलेक्ट्रा ग्रीनटेकने (Olectra Greentech) हायड्रोजन बस विकसित करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत भागीदारीची घोषणा केली. यानंतर शुक्रवारी ऑलेक्ट्रा ग्रीनटेकच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. पारंपारिक सार्वजनिक वाहतुकीसाठी ते पूर्णपणे कार्बनमुक्त वाहने विकसित करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

भारताच्या कार्बन मुक्त हायड्रोजन महत्त्वाकांक्षा साध्य करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे वायू प्रदूषण आणि उत्सर्जन कमी होईल. ज्याचा पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत ऑलेक्ट्राच्या भागीदारीमुळे हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेसच्या विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे.

हायड्रोजन बस पारंपारिक सार्वजनिक वाहतुकीला पूर्णपणे कार्बनमुक्त पर्याय असल्याचे मेघा इंजीनियरिंग एंड इंफ्रास्ट्रक्चरची उपकंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेकचे म्हणणे आहे. नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास आणि वायू प्रदूषण आणि उत्सर्जनाचे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी ऑलेक्ट्राने हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेसच्या विकासाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑलेक्ट्रा ग्रीनटेकचा शेअर शुक्रवारी बीएसईवर 17.87 टक्क्यांनी वाढून 473.90 रुपयांवर व्यवहार करत होता. यावेळी तो 477 रुपयांच्या उच्चांकी आणि 425.55 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. काउंटरमध्ये 227,688 शेअर्सची विक्री झाली. पाच दिवसांच्या सरासरी 73,544 शेअर्सच्या तुलनेत तो 209.59 टक्क्यांनी वाढला. येत्या काळात शेअरमध्ये चांगली तेजी दिसेल असे शेअर बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे, त्यांनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेकासाठी 455 रुपयांच्या आसपास खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.