
Penny Stocks : पेनी स्टॉक्सची कमाल, गाठले अप्पर सर्कीट
Penny Stocks : शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे. यामध्ये सर्व प्रमुख इंडेक्स 2% पेक्षा जास्त घसरलेत. उच्च व्याजदराच्या शक्यतेने बाजारात घसरण होताना दिसत आहे. सर्व सेक्टरल इंडेक्स घसरल्याने पॉवर आणि रिअल इस्टेट सेक्टरला या तोट्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्याचवेळी बीएसई हेल्थकेअर आणि बीएसई फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्सना (एफएमसीजी) सर्वात कमी दबाव पाहायला मिळाला.
बीएसईवरील 905 शेअर्समध्ये तेजी दिसून आली, तर 2,253 शेअर्समध्ये घसरण झाली. कॉफी डे एंटरप्रायझेसचे शेअर्स, बीएसईवरील टॉप स्मॉलकॅप गेनर 10% पेक्षा जास्त वाढले. ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस आणि आयटीआय लिमिटेडच्या शेअर्सचीही मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.
अप्पर सर्कीट हिट करणाऱ्या पेनी शेअर्सची लिस्ट
कंपनी लेटेस्ट ट्रेडिंग प्राईस चेंज %
हिंदुस्थान बायो सायन्सेस 4.85 % 9.98%
युनिव्हर्सल ऑफीस ऑटोमेशन 4.16% 9.76%
जेमस्टोन इनव्हेस्टमेंट्स 0.93% 9.41%
केएमएफ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 5.25% 5%
सनसिटी सिन्थेटिक्स 6.94% 4.99%
सेन्सेक्समध्ये सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला मात्र चांगला फायदा झाल्याचे दिसून आले. बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह आणि इंडसइंड बँकचे शेअर्समध्येही खरेदी दिसून आली.