Share Market : आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

यूएस महागाई डेटा जारी करणार आहे, जे फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या (FOMC) पुढील बैठकीसाठी दिशा ठरवेल.
Share Market
Share MarketSakal

Share Market : मंगळवारी बाजारात शेवटच्या तासात विक्री झाली. यामुळे सुरुवातीची तेजी संपुष्टात आली. काही आगामी डेटा पॉइंट्सच्या चिंतेमुळे व्यापाऱ्यांनी प्रॉफिट बुक करण्याचा निर्णय घेतला. यूएस महागाई डेटा जारी करणार आहे, जे फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या (FOMC) पुढील बैठकीसाठी दिशा ठरवेल.

यूएस चलनवाढीचा दर, जो मार्चपासून 5% वर अपरिवर्तित राहण्याची आशा आहे, तो उच्च राहिला तर फेड कडक होईल. पण विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (FIIs) सततच्या पाठिंब्याने देशांतर्गत बाजारातील तीव्र घसरण रोखली. निफ्टी 50 इंडेक्स 1.55 अंकांनी अर्थात 0.01% वाढून 18,265.95 वर बंद झाला. दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 2.92 अंकांनी घसरून 61,761.33 वर बंद झाला. (pre analysis of share market update 10 may 2023 )

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टी 18,300 च्या वर उघडला आणि 18,344 वर पोहोचल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे यांनी म्हटले. पण ट्रेडिंगच्या शेवटच्या काही तासांमध्ये बहुतेक नफा गमावला. बाजाराचा शेवट 1.6 अंकांच्या घसरणीसह 18,266 वर झाला. एकूणच, इंडेक्सने दिवसभरात 18,345 आणि 18,229 च्या रेंजमध्ये व्यवहार केले.

Share Market
Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार खरेदी; सेन्सेक्समध्ये 700 अंकांची वाढ, 'या' शेअर्सचे...

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते ?

डिव्हीस लॅब (DIVISLAB)

इंडसइंड बँक (INDUSINDB

कोल इंडिया (COALINDIA)

टीसीएस (TCS)

ऍक्सिस बँक (AXISBANK)

ए यू बँक (AUBANK)

लॉरस लॅब (LAURUSLABS)

इंडियन हॉटेल (INDHOTEL)

ट्रेंट (TRENT)

हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com