सिंजीन

सिंजीन ही कंपनी आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये हेल्थकेअर रिसर्च ॲनालिटिक्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये काम करते.
syngene
syngene sakal
Summary

सिंजीन ही कंपनी आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये हेल्थकेअर रिसर्च ॲनालिटिक्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये काम करते.

- ऋत्विक जाधव

सिंजीन ही कंपनी आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये हेल्थकेअर रिसर्च ॲनालिटिक्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये काम करते. या कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन ६२३१६०७६.३५ लाख आहे. बंगळूरस्थित ही कंपनी संशोधन, विकास आणि उत्पादन या तिन्ही क्षेत्रांमध्ये कार्यरत असून, प्राथमिक शोधापासून ते व्यावसायिक पुरवठ्यापर्यंत सर्व कामे करते. कंपनीत पाच हजारांहून अधिक शास्त्रज्ञांचा समावेश आहे.

बंगळूर, हैदराबाद आणि मंगलोर या तीन ठिकाणी वीस लाख चौरस फूट पसरलेल्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज प्रकल्पाद्वारे कंपनीचे कामकाज चालते. बायोकॉन लि.च्या प्रवर्तक किरण मुजुमदार शॉ यांनी ही कंपनी सुरू केली होती. फार्मास्युटिकल, बायोटेक्नॉलॉजी, पोषण, प्राण्यांचे आरोग्य, ग्राहकोपयोगी वस्तू आणि विशेष रसायन तयार करणाऱ्या कंपन्या सिंजीन या कंपनीवर अवलंबून आहेत.

जागतिक दर्जाचे नावीन्यपूर्ण वैज्ञानिक उपाय वितरित करणे हे कंपनीचे ध्येय आहे. तांत्रिक प्रगती आणि ४०० हून अधिक पेटंट यामुळे या क्षेत्रात भरीवपूर्ण कामगिरी ही कंपनी करू शकते. कंपनी ग्राहकांना एंड टू एंड सोल्युशन्स उपलब्ध करते. गुणवत्ता आणि मजबूत पुरवठा साखळीद्वारे कंपनीने उत्तम कामगिरी केली आहे. भक्कम फंडामेंटल आणि उत्तम बॅकग्राऊंड असल्याने ही कंपनी गुंतवणूक करण्यास एक योग्य कंपनी ठरते.

शेअरचा इतिहास

ऑगस्ट २०१५ मध्ये १४७.५ रुपयांवर नोंदणी झालेल्या या शेअरने आजपर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. नोंदणी दिवसापासून आतापर्यंत कंपनीने सुमारे २८८ टक्के परतावा दिला आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये तांत्रिक सामर्थ्यावर शेअरचा भाव तेजीत होता. फेब्रुवारी २०२० मध्ये शेअरच्या भावात मोठी घसरण झाली; परंतु त्यातून सावरण्यात आणि नवा उच्चांक गाठण्यात कंपनीत यश आले.

डिसेंबर २०२० पासून शेअरने एका ठराविक पट्ट्यात चढउतार करण्यास सुरुवात केली. आजच्या तारखेपासून मागील दोन वर्षांत हा शेअर एका पट्ट्यातच व्यवहार करत आहे. तांत्रिकदृष्ट्या चार्टवर पॉझिटिव्ह डायव्हर्जन मुळे मोठ्या प्रमाणात ताकद एकवटताना दिसत आहे आणि आगामी काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार दिसून येऊ शकतात.

तांत्रिक विवेचन

या शेअरचा चार्ट पॅटर्न इतरांच्या तुलनेत बराच मजबूत आहे. सिंजीनचा शेअरभाव मार्च २०२० पासून सुमारे २०० टक्के वाढला आहे. आता हा शेअर मोठ्या ब्रेक आऊटसाठी तयार होताना दिसत आहे. या प्रकारच्या चार्ट पॅटर्नमध्ये आपण प्रथम एक मोठी रॅली पाहू शकतो ज्यामुळे फ्लॅगचा पोल तयार होतो आणि त्यानंतर कमी व्हॉल्युमसह होणाऱ्या कन्सोलिडेशनमुळे त्रिकोणी आकारातील फ्लॅग तयार होताना दिसते.

जे अशा प्रकारचा पॅटर्नसाठी उत्तम फॉर्मेशन असते. सध्याच्या बाजारभावापासून ते ५५० च्या भावापर्यंत याची आक्रमकपणे खरेदी करणे योग्य ठरेल. या खरेदीनंतर ५२० रुपयांच्या साप्ताहिक क्लोजवर स्टॉपलॉस ठेवणे महत्त्वाचे आहे. येत्या काही आठवड्यात या शेअरमध्ये मोठी तेजी दिसण्याची शक्यता असून, मध्यम अवधीमध्ये या शेअरचे लक्ष्य ८५० ते १००० अपेक्षित आहे. रिस्क रिवॉर्ड रेशो १:४ असून, रिस्क मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून हा गुंतवणूक निर्णय आणखीन चांगला ठरू शकतो. अल्प जोखीम घेऊन मोठ्या उद्दीष्टाची अपेक्षा आहे. नजीकच्या भविष्यात सुमारे किमान ७० टक्के नफा अपेक्षित आहे.

(वरील शिफारस पूर्णपणे तांत्रिक विश्लेषणावर आधारित आहे. जी भविष्यातील किमतीच्या हालचालीचा अंदाज लावण्याचा एक प्रकारचा वैज्ञानिक मार्ग आहे. सर्व गुंतवणूकदारांनी इक्विटी गुंतवणुकीतील जोखमींबद्दल योग्य माहिती घ्यावी. लेखकाचे या शेअरमध्ये वा कंपनीमध्ये कोणतेही वैयक्तिक हितसंबंध नाहीत आणि या शेअरमध्ये गुंतवणूक नाही. तथापि, त्यांच्या काही ग्राहकांची यामध्ये गुंतवणूक असू शकते.)

शेअरचे नाव - सिंजीन

शिफारस - खरेदी

सध्याचा भाव - ५७४.१

स्टॉपलॉस - ५२०

लक्ष्य - ८५० - १०००

कालावधी - ६ ते ८ महिने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com