कजारिया सिरॅमिक्स

कजारिया सिरॅमिक ही देशातील सिरॅमिक आणि व्हिट्रिफाइड टाइल्सची सर्वांत मोठी उत्पादक आहे.
kajariaceramics stock price
kajariaceramics stock pricesakal
Summary

कजारिया सिरॅमिक ही देशातील सिरॅमिक आणि व्हिट्रिफाइड टाइल्सची सर्वांत मोठी उत्पादक आहे.

- ऋत्विक जाधव

कजारिया सिरॅमिक ही देशातील सिरॅमिक आणि व्हिट्रिफाइड टाइल्सची सर्वांत मोठी उत्पादक आहे. ही कंपनी कंझ्युमर ड्युरेबल या सेक्टरच्या इंडेक्स अंतर्गत येते. तिचे भांडवली बाजारमूल्य (मार्केट कॅप)१८,२७,९८९ लाख रुपये आहे.

सध्या, भारतीय प्रवर्तकांचा हिस्सा ४७.४९ टक्के असून, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (DII) हिस्सा २६.२४ टक्के आणि परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (FII) हिस्सा १६.९ टक्के आहे. कंपनीची वार्षिक एकूण क्षमता ८४.४५ दशलक्ष चौरस मीटर आहे.

सिकंदराबाद, राजस्थानमधील गेलपूर आणि मलूटाना, आंध्र प्रदेशातील विजयवाडा आणि श्रीकालहस्ती, तेलंगणातील बालानगर आणि गुजरातमधील दोन प्रकल्प अशा आठ प्रकल्पांद्वारे किचन टाइल्स, बाथरूम टाइल्स, वॉल टाइल्स, फ्लोअर टाइल्स आणि बाह्य भिंतीवरील टाइल्ससह विविध प्रकारच्या टाइल्सचे उत्पादन केले जाते.

शेअरचा इतिहास

नोव्हेंबर १९९४ रोजी १२.६० रुपयांवर सूचीबद्ध झालेल्या या शेअरने आजपर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. तो सुमारे ११३९९० टक्के आहे. दीर्घकालीन चार्टवर, हा शेअर २०२१ पर्यंत वाढत्या ट्रेंडमध्ये होता,

त्यानंतर ट्रेंड रिव्हर्सल दिसला आणि या शेअरने ऑगस्ट २०२१ पर्यंत रु. ५,०५४ च्या स्तरावरून रु. २,६५० पर्यंत नीचांकी सुधारणा दर्शविली; परंतु तेव्हापासून तो कन्सोलिडेट होत आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्यात हा शेअर कधीही अपयशी ठरला नाही. तांत्रिकदृष्ट्या हा एक बाजूचा ट्रेंड आहे जो ब्रेकआउट येण्याचे संकेत देतो.

तांत्रिक विश्‍लेषण

या विशिष्ट शेअरचा चार्ट पॅटर्न इतरांच्या तुलनेत सर्वांत मजबूत आहे. कजारिया सिरॅमिक्सने गेल्या काही दिवसांपासून ताकदीची चिन्हे दाखवली आहेत आणि शुक्रवारी पाच मे २०२३ रोजी जोरदार ब्रेकआउट दिला आहे. सप्टेंबर २०२१पासून तयार होत असलेल्या ‘बुलिश त्रिकोण पॅटर्न’ची निर्मिती दिसत आहे.

हे भविष्यात शेअरची ताकद आणि क्षमता दर्शवते. डेरिव्हेटिव्ह डेटादेखील तेजीच्या बाजूने आहे. यातील लाँग बिल्डअप अल्पावधीतही ताकद दर्शवते. साप्ताहिक बंदच्या आधारावर एक हजार रुपयांचा स्टॉपलॉस ठेवून १०४०-११५० रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करणे सुरू केले पाहिजे. येत्या काही दिवसांत या शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

अल्प मुदतीसाठी, रु. १४०० ही आमची लक्ष्य किंमत असेल. मध्यम मुदतीसाठीचे लक्ष्य १,६०० रुपये आहे. अल्प-मुदतीच्या लक्ष्यासाठी, रिस्क टू रिवॉर्ड गुणोत्तर १:३ आहे जे गुंतवणुकीचा निर्णय अधिक योग्य बनवते. हा शेअर ४० टक्क्यांच्या आसपास नफा मिळवून देण्याची अपेक्षा ठेवून गुंतवणूक करता येईल.

शेअरचे नाव : कजारिया सिरॅमिक्स

शिफारस : खरेदी

सध्याचा भाव : रु. १,१५०

स्टॉपलॉस : रु.९८०

लक्ष्य : रु. १,४००

कालावधी : तीन ते सहा महिने

(लेखक तांत्रिक विश्लेषक आहेत आणि किरण जाधव अँड असोसिएट्स, पुणे येथे काम करतात.)

(डिस्क्लेमर आणि डिस्क्लोजर ः वरील शिफारस पूर्णपणे तांत्रिक विश्लेषणावर आधारित आहे, जी भविष्यातील किमतीच्या हालचालीचा अंदाज लावण्याचा एक प्रकारचा वैज्ञानिक मार्ग आहे. सर्व गुंतवणूकदारांनी इक्विटी गुंतवणुकीतील जोखमींबद्दल योग्य माहिती घ्यावी. या शेअरमध्ये माझी गुंतवणूक नाही. तथापि, आमच्या क्लायंट्सची काही पोझिशन असू शकते.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com