Share Market : होळी आज आहे की उद्या? शेअर बाजारने घेतला हा निर्णय...स्टॉक ब्रोकर्सनी केली ही मागणी | Share Market Holi Festival Holiday | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : होळी आज आहे की उद्या? शेअर बाजारने घेतला हा निर्णय...स्टॉक ब्रोकर्सनी केली ही मागणी

Share Market : होळी या सणामुळे या आठवड्यात शेअर बाजारमध्ये फक्त चार दिवस व्यव्हार सुरू असणार. विशेष बाब म्हणजे देशभरात 8 मार्च म्हणजेच बुधवारी होळी साजरी केली जाणार आहे मात्र शेयर मार्केट आज 7 मार्चला बंद आहे म्हणजेच शेअर मार्केटची होळी आज आहे.

दोन्ही एक्सचेंज म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) नी आपल्या वेबसाइटवर होळीच्या सुट्टीविषयी माहिती दिली. मार्च महिन्यात शेअर मार्केट होलीची सुट्टी मिळून दोन दिवस बंद राहणार. (Share Market Holi Festival Holiday)

दोन्ही एक्सचेंजमध्ये बंद राहणार व्यव्हार

सात मार्चला BSE आणि NSE वर इक्विटी, इक्विटी डेरिवेटिव्स आणि सिक्युरिटी लँडिंग अँड बॉरोईंग (SLB)चा व्यव्हार बंद असणार. स्टॉक ब्रोकर्सनी 8 मार्चला होळीच्या सुट्टीची मागणी केली होती. बाजार नियामक SEBIच्या वेबसाइटवर होळीची सुट्टी 7 मार्चला दाखवण्यात आली आहे.

त्यामुळे या आठवड्यात शेअर बाजार फक्त चार दिवसच ट्रेडिंगवर असणार. शेअर बाजार सोमवारपासून शुक्रवार असे पाच दिवस सुरू असतो तर शनिवार आणि रविवार असे दोन दिवस शेअर बाजार बंद असतो.

कमोडिटी डेरिवेटिव्स सेगमेंट

कमोडिटी डेरिवेटिव्स सेगमेंट आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट्स (EGR) सेगमेंट मध्ये ट्रेडिंग सकाळच्या सत्रात म्हणजेच सकाळी 9:00 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत बंद असणार तर सायंकाळी सुरू होणार.

याचा अर्थ कमोडिटी डेरिवेटिव्स सेगमेंट आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट्स (EGR) सेगमेंट मध्ये ट्रेडिंग सकाळी 9:00 वाजता सुरू होणार नसून सायंकाळी 5:00 वाजता सुरू होणार.

30 मार्चलाही बंद असणार शेअर बाजार

मार्च 2023 मध्ये शेअर बाजारात दोन सुट्ट्या आहे. एक होळीची तर दुसरी सुट्टी ही 30 मार्च 2023 ला रामनवमीच्या दिवशीची आहे. शेअर मार्केट 30 मार्चला रामनवमीनिमित्त असणार.

एप्रिलमध्येही असणार शेअर मार्केटला सुट्ट्या

एप्रिलमध्ये 4,7 आणि 14 एप्रिल असे तीन दिवस शेअर बाजार बंद असणार. बीएसई आणि एनएसई 4 एप्रिल 2023 ला महावीर जयंतीनिमित्त, 7 एप्रिल 2023 ला गुड फ्राइडे आणि 14 एप्रिल 2023 ला आंबेडकर जयंतीनिमित्त बंद असणार.