
Asian Energy च्या शेअर्सची कमाल, महिन्याभरात दुप्पट रिटर्न
Asian Energy : शेअर बाजाराच्या अस्थिर वातावरणातही एशियन एनर्जीच्या शेअर्सने (Asian Energy) दमदार रिटर्न दिला आहे. खराब सप्टेंबर सहामाही निकाल आणि इंडिया रेटिंग्जने रेटिंग डाउनग्रेड करूनही कंपनीने चांगला फायदा मिळवला आहे.
या महिन्यात त्याच्या शेअर्सने 85 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर शुक्रवारी इंट्रा-डे लेव्हलवर, एशियन एनर्जीने एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. (share market news Asian Energy shares are in growth gave double return in a month)
शुक्रवारी एका प्रमोटरने एशियन एनर्जीमध्ये आपला हिस्सा वाढवला आहे, ज्यामुळे त्याचे शेअर्स जवळपास पाच टक्क्यांनी वाढले. पण कमकुवत बाजार आणि नफावसुलीमुळे तो 3.06 टक्क्यांनी घसरून 102 रुपयांवर बंद झाला. त्याच्या शेअर्सने इंट्रा-डेमध्ये बीएसईवर 110.40 रुपयांचा उच्चांक गाठला.
एशियन एनर्जीची होल्डिंग कंपनी ऑईलमॅक्स एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडला (Oilmax Energy Pvt Ltd) 20 वर्षांसाठी मायनिंग लीज मिळाली आहे आणि ही लीज 1 एप्रिल 2023 पासून सुरू होईल. एशियन एनर्जीने फायलिंगमध्ये माहिती दिली. डीएसएफ ब्लॉकमधून कच्चे तेल आणि वायू काढण्यासाठी गुजरात सरकारकडून ही लीज मिळाली आहे.
कंपनीला यूएईच्या स्वेतह एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर एफझेडईकडून (Svetah Energy Infrastructure FZE) 165 कोटी रुपयांच्या पुरस्कारासाठी पत्र मिळाल्याची घोषणा केली होती.
ज्या अंतर्गत स्वेतह एनर्जीमध्ये ती प्रॉडक्शन स्टोरेज आणि ऑफलोडिंग सिस्टमचे (FPSO) मॅनेजमेंट आणि मेन्टेनन्सचे काम करेल. FPSO चा उपयोग पुद्दुचेरी किनाऱ्यावरून तेल आणि वायू काढण्यासाठी केला जाईल. हा करार पाच वर्षांसाठी आहे.
इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चने गेल्या महिन्यात एशियन एनर्जीचे लाँग टर्म रेटिंग IND BBB वरून IND BBB- असे खाली आणले. पण त्याचा स्टेबल आऊटलूक कायम ठेवला आहे. एप्रिल-सप्टेंबर 2022 मध्ये कंसालिडिटेड रेव्हेन्यू आणि नफ्यात घट झाल्यामुळे रेटिंग एजन्सीने हे रेटिंग दिले होते. पण असे असतानाही कंपनीने शानदार कमबॅक केले आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.