
Vedanta Shares मध्ये तेजी, कर्ज कमी करण्याच्या दृष्टीने हालचाल...
वेदांताच्या (Vedanta) शेअर्समध्ये सध्या चांगली तेजी आल्याचे दिसून आले. वेदांत लि. बार्कलेज जेपी मॉर्गन आणि स्टँडर्ड चार्टर्डसह किमान तीन बँकांशी 1 अब्ज डॉलर कर्जासाठी बोलणी करत आहे. ब्लूमबर्गने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
या बातमीनंतर वेदांतच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. सुमारे 6 टक्क्यांच्या मजबूत इंट्राडे रॅलीसह ते शुक्रवारी बीएसईवर 290.45 रुपयांवर पोहोचले. वेदांतने गेल्या महिन्यात चालू आर्थिक वर्षात एकूण कर्जात 2 अब्ज डॉलरचे कर्ज कमी करण्याच्या दिशेने काही पावलं उचलली होती. (share market news Vedanta Shares increased read reason)
सध्या वेदांता कंपनी लिक्विडिटी आणि कर्जाची परतफेड करण्याच्या क्षमतेशी संबंधित गुंतवणुकदारांची चिंता दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.
गेल्या एका महिन्यात वेदांताचे शेअर्स जवळपास 20 टक्क्यांनी घसरले आहेत. एका वर्षात हा स्टॉक जवळपास 27 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या वर्षी 11 एप्रिलला या शेअरने 440.75 रुपयांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता.
कंपनीने तीन वर्षांत 4 अब्ज डॉलरचे कर्ज कमी करण्याचे टारगेट पहिल्या वर्षातच गाठले आहे. कंपनीने पुढील दोन वर्षांत 7.7 अब्ज डॉलरचे निव्वळ कर्ज संपवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. जागतिक स्तरावर व्याजदरात वाढ झाल्यामुळे वेदांतासारख्या कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. तसेच, जागतिक मंदीच्या भीतीने कमोडिटी कंपन्यांची चिंता वाढली आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.