.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
स्टील पाईप उत्पादन कंपनी हाय-टेक पाईप्सच्या (Hi-Tech Pipes) शेअर्सने नुकताच 192.75 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. ऑर्डर मिळाल्याच्या बातमीमुळे स्टॉकमध्ये मोठी वाढ झाली आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत कंपनीने सांगितले की, हाय-टेक पाईप्सला रिन्युएबल एनर्जी सेक्टरकडून 105 कोटीच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. हा एक मल्टीबॅगर स्टॉक आहे. या शेअरने एका वर्षात सुमारे 150 टक्के परतावा दिला आहे.