
Trump’s Reciprocal Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच 'रेसिप्रोकल टॅरिफ' धोरणाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे जागतिक व्यापार युद्धाची भीती निर्माण झाली असून, गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
परिणामी, शेअर बाजारात सातत्याने घसरण होताना दिसत आहे. अनेक गुंतवणूकदार घाबरून आपले शेअर्स विकत आहेत. पण खरंच यामुळे घाबरण्याची गरज आहे का? याचा परिणाम किती काळ होणार आहे आणि गुंतवणूकदारांनी आता काय करावं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.