
भारतीय शेअर बाजाराने आज माफक तेजीसह सुरुवात केली. सेन्सेक्स ९३ अंकांच्या वाढीसह ८३,७९० वर उघडला, तर निफ्टी ४७ अंकांनी वधारून २५,५८८ वर पोहोचला. विशेष म्हणजे, बँक निफ्टीने ९९ अंकांची वाढ नोंदवत ५७,५५८ चा विक्रमी उच्चांक गाठला. चलन बाजारात रुपया ८६.५८/$ वर उघडला, तर कमोडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींनीही मजबूत कामगिरी दाखवली.