

Stock Market
Sakal
Indian Stock Market Today : सोमवारी महिन्याच्या सुरुवातीला जागतिक बाजारातील स्थिरता आणि सकारात्मक भावनेच्या आधारावर भारतीय शेअर बाजार हिरव्या रंगात उघडला. सेन्सेक्स 86,065 वर उघडला, जो 359 अंकांनी वाढला आहे, तर निफ्टी 123 अंकांनी वाढून 26,325 अंकांवर उघडला.
त्यानंतर, सेसेक्स आणि निफ्टी अनुक्रमे 86,159 आणि 26,325 या नव्या सर्वकालीन उच्चांक स्तरावर पोहोचले. तर निफ्टी बँक निर्देशांकानेदेखील 60,114.05 हा नवीन उच्चांक गाठला.