zee entertainment share price : झी एंटरटेनमेंटच्या शेअर्समध्ये मोठी घसरण, काय आहे कारण ?

झी एंटरटेनमेंटचे शेअर्स सध्या 9.18 टक्क्यांनी घसरून 187 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
Shares of Zee Entertainment Enterprises Ltd
Shares of Zee Entertainment Enterprises Ltdesakal

zee entertainment share price : झी ग्रुपची कंपनी झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये सध्या जोरदार विक्री होताना दिसत आहे. गुरुवारी इंट्रा-डेमध्ये तो 14 टक्क्यांहून अधिक घसरून 176.60 रुपयांवर आला. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (NCLT) आदेशामुळे त्याच्या शेअर्समध्ये ही घसरण होत आहे.

एनसीएलटीने झी एंटरटेनमेंटच्या दिवाळखोरी प्रक्रियेला मान्यता दिली आहे. झी एंटरटेनमेंटचे शेअर्स सध्या 9.18 टक्क्यांनी घसरून 187 रुपयांवर व्यवहार करत आहेत. इंडसइंड बँकेच्या याचिकेवर एनसीएलटीने हा आदेश दिला आहे. ( zee entertainment share price decreased read reason)

Shares of Zee Entertainment Enterprises Ltd
ZEE Entertainment चे सोनी कंपनीत विलीनीकरण, संचालकांची मंजूरी

झी एंटरटेनमेंटने नुकीतच एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये एनसीएलटी ऑर्डरची माहिती दिली. एनसीएलटीने 22 फेब्रुवारी 2023 रोजी झी एंटरटेनमेंटची कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

इंडसइंड बँकेने दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता, 2016 च्या कलम 7 अंतर्गत कंपनीविरुद्ध याचिका दाखल केली होती. तीन वर्षांपूर्वी फेब्रुवारी 2020 मध्ये, इंडसइंड बँकेने झी एंटरटेनमेंटच्या 89 कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी दिवाळखोरी न्यायालयात धाव घेतली.

Shares of Zee Entertainment Enterprises Ltd
Zee Marathi Award: अभिनेत्री रंगल्या नात्यांच्या उत्सवात

चालू आर्थिक वर्ष 2022-23 ची तिसरी तिमाही ऑक्टोबर-डिसेंबर 2022 झी एंटरटेनमेंटसाठी चांगली राहिलेली नाही. कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 92 टक्क्यांनी घसरून 298.98 कोटी रुपयांवरून केवळ 24.32 कोटी रुपयांवर आला आहे.

झी एंटरटेनमेंटचे शेअर्स गेल्या वर्षी 4 एप्रिल 2022 रोजी 308.65 रुपयांवर होते, जे एका वर्षातील विक्रमी उच्चांक आहे. आतापर्यंत या पातळीपासून 39 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. गुरुवारी ते इंट्रा-डेमध्ये 176.60 रुपयांपर्यंत खाली आले होते, जे एका वर्षातील विक्रमी नीचांकी आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com