
अॅड. गोविंद पटवर्धन
gypatwardhan@gmail.com
स्वतःच्या मालकीचे घर असावे, हे प्रत्येकाचे आयुष्यातील अनेक स्वप्नांपैकी पहिले आणि मुख्य स्वप्न असते. त्यासाठी अनेक जण आयुष्यभर कष्ट करून आपले स्वप्नातील घरकूल उभारतात. कर्जाचा बोजा अनेक वर्षे डोक्यावर घेऊन जगत राहतात. तरीही असंख्य असे लोक आहेत, ज्यांना आपले हे स्वप्न पूर्ण करणे शक्य होत नाही. ते आयुष्यभर भाड्याच्या घरात राहतात. अलीकडच्या काळात स्वमालकीचे घर असण्याऐवजी भाडेतत्त्वावरील घर घेणे अधिक सयुक्तिक आणि आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरते, हा विचार प्रभावी ठरत आहे. या दोन्ही बाबींचा साधक-बाधक विचार करणे महत्त्वाचे आहे.