

Signpost India: A digital advertising growth opportunity
Sakal
भूषण ओक, शेअर बाजार विश्लेषक
आजच्या डिजिटल आणि तीव्र स्पर्धेच्या जगात उत्पादने किंवा सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरात हे सर्वांत महत्त्वाचे आणि प्रभावी माध्यम आहे. ग्राहकांच्या खरेदीचे निर्णय प्रभावित करण्यात आज जाहिरातींची भूमिका निर्णायक ठरत आहे. या क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे, ती म्हणजे २००८ मध्ये स्थापन झालेली साइनपोस्ट इंडिया. ही कंपनी २०२३ मध्ये प्रेसमन ॲडव्हर्टायझिंगबरोबरच्या विलीनीकरणानंतर बाजारात नोंदणीकृत झाली. कंपनी सार्वजनिक ठिकाणे, वाहतूक नेटवर्क म्हणजे प्रमुख रस्ते, बसेस आणि वाहनतळ, विमानतळ आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये जाहिरातींचे संपादन, निर्मिती आणि व्यवस्थापन करते. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीपाद अष्टेकर यांचा कंपनीत २९ टक्के हिस्सा आहे.