

RBI Silver Loan Rules 2026
esakal
RBI Silver Loan New Rules : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 'गोल्ड आणि सिल्वर लोन डायरेक्शन, २०२५' जाहीर केले असून यानुसार आता सोन्याप्रमाणेच चांदी तारण ठेवून कर्ज घेता येणार आहे. हा नवा नियम १ एप्रिल २०२६ पासून अधिकृतपणे लागू होणार असून याद्वारे बँका, NBFC आणि सहकारी बँकांना चांदीच्या दागिन्यांवर कर्ज देण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे घरातील पडून असलेल्या चांदीचा वापर आता आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी करता येईल.