

Why Silver Prices Dropped Suddenly in India Key Reasons
esakal
Gold-Silver Price Today Maharashtra : गेल्या काही काळापासून गगनाला भिडलेल्या चांदीच्या किमतींनी आता अचानक खालची दिशा धरली आहे. जागतिक बाजारपेठेतील घडामोडींचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावर झाला असून अवघ्या दोन दिवसांत चांदीच्या दरात तब्बल ११,००० रुपयांची मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच चांदीने ९९,००० रुपयांचा टप्पा ओलांडला होता, मात्र आता या घसरणीमुळे चांदी पुन्हा एकदा स्वस्त झाली आहे