
Diwali 2025: धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीच्या भावामध्ये मोठा उच्चांक बघायला मिळत आहे. भारतात एक किलो चांदीची किंमत आता २ लाख रुपयांवर पोहोचली आहे. तर सोन्याची किंमत १.३ लाख रुपये प्रति १० ग्रॅम इतकी आहे. सोनं आणि चांदीच्या किंमतींमध्ये झालेली वाढ ही जागतिक अस्थिरता, भू-राजकीय तणाव आणि पुरवठ्याच्या कमतरतेमुळे यामुळे आहे.