
डॉ. वीरेंद्र ताटके - गुंतवणूक विषयाचे अभ्यासक
शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड हा गुंतणवूक पर्याय फक्त पैसेवाल्यांसाठी आहे, कारण तिथे गुंतवणूक करण्यासाठी भरपूर पैशांची आवश्यकता असते, असा गैरसमज आजही दिसतो. म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’कडे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा गेल्या काही काळात वाढत असलेला सहभाग हा गैरसमज कमी करण्यास मदत करत असला, तरीदेखील छोट्या गावातील आणि कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी अजूनही प्रयत्न आवश्यक आहेत. या प्रयत्नांपैकी एक प्रयत्न म्हणजे शंभर रुपयांची ‘एसआयपी’!