

Small Cap Funds Performance 2026 How Smaller Companies Mutual Funds Outperformed Large Cap Investment Categories
sakal
दिवाळीतील काही फटाके दिसायला छोटे असतात; मात्र त्यांच्या आवाजाचा धमाका दणदणीत असतो. अगदी त्याचप्रमाणे स्मॉल कॅप फंडांनी २०२६ या वर्षात लक्षणीय कामगिरी केली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा विचार करताना मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे लार्ज कॅप फंड अधिक सुरक्षित आणि हमखास परतावा देणारे, अशी सर्वसाधारण समजूत असते. मात्र, २०२६ मधील फंडांच्या कामगिरीकडे पाहिल्यास वेगळे चित्र दिसते.