स्मार्ट सल्ला : पुन्हा शुभमंगल? अतिसावधान!

उतारवयातील पुनर्विवाहात संपत्तीच्या हक्कांवरून वाढलेला तणाव, मुलांची नाराजी आणि भविष्यातील वाद टाळण्यासाठी स्वतंत्र नोंदणीकृत इच्छापत्राचा मार्ग
Proper estate planning ensures legal clarity and protects the interests of both spouses and their children.

Proper estate planning ensures legal clarity and protects the interests of both spouses and their children.

Sakal

Updated on

गौरी रास्ते, इच्छापत्र सल्लागार

सुरेशकाका व मालतीताई यांच्या पुनर्विवाहाला आज एक वर्ष पूर्ण झाले होते. ते दोघेही आपल्या सहजीवनावर खूष होते. परंतु, त्या दोघांच्या मुलांनी मात्र त्यांच्याकडे पूर्ण पाठ फिरवली होती. दोघांनाही मुलांची नाराजी सतत झेलणे अत्यंत अवघड झाले होते. सुरेशकाका ६८ वर्षांचे आणि मालतीताई ६५ वर्षांच्या होत्या. दोघांची मूळ जोडीदाराची साथ सुटल्याने एकट्याने आयुष्य जगण्याऐवजी एकत्र आयुष्य काढण्याचा व विवाह करण्याचा निर्णय दोघांनी विचारपूर्वक घेतला होता. वर्षाच्या सहजीवनानंतर हा निर्णय योग्य असल्याची दोघांची खात्री पटली होती. आता मुलांनी आपले नाते स्वीकारावे यासाठी दोघेही समुपदेशनासाठी आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com