
डॉ. अनंत सरदेशमुख
anant.sardeshmukh@gmail.com
जाहिरात हा कोणत्याही उत्पादनाच्या किंवा सेवेच्या विक्रीसाठी आवश्यक असलेला महत्त्वाचा घटक आहे. आजच्या काळात तर केवळ उत्पादन चांगले असून चालत नाही, त्याचे महत्त्व ग्राहकापर्यंत न्यावे लागते, ते ग्राहकांना पटवावे लागते; तरच ग्राहक आपल्याकडे येतो. अशा प्रकारे ग्राहकांना प्रभावीपणे आपल्याकडे आणण्यास मदत करणारी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली ‘इन एआय वेज टेक्नॉलॉजीज’ या पुण्यातील स्टार्ट-अपने विकसित केली आहे. २०२१ पासून अनेक उद्योग-व्यवसायांना सेवा पुरवणाऱ्या या अनोख्या स्टार्ट-अपविषयी...