
सध्या सर्वत्र चर्चा आहे ती अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांच्या लांबलेल्या अंतराळ प्रवासाची. त्यांचा आठ दिवसांचा प्रवास नऊ महिन्यांपर्यंत लांबला, मात्र या सर्व घडामोडीत त्यांच्या ज्ञानाबरोबर धैर्याचीदेखील कसोटी लागली आणि या सर्वांत ते उत्तम कार्य करून पृथ्वीवर परतले.
हाच संदर्भ घेऊन या लेखात आपण गेल्या दोन दशकांतील कोणत्या शेअरने गटांगळी खाल्ली आणि नंतर बाजारातील तेजीत उत्तम कामगिरी करून गुंतवणूकदारांना भरभरून परतावा दिला, याचा वेध घेऊ या.
लेहमन ब्रदर्स आणि कोविड महासाथ या दोन मोठ्या घडामोडींमध्ये बाजाराची धूळधाण झाली होती, मात्र, त्या घटनेनंतर बाजाराने मोठी उसळी देत चांगला परतावा देखील दिला. पडझडीनंतर त्यांनी दिलेला परतावा उत्तम होता. शेअर बाजारातील गुंतवणुकीत चढ-उतार हा त्याचा स्थायीभाव आहे, त्यामुळेच तो सदा चिरतरुण असतो, असे म्हणतात. खालील चौकट पहा