
सध्याच्या अस्थिर वातावरणात गुंतवणूकदारांना कुठे आणि कशी गुंतवणूक करावी, असा प्रश्न पडत आहे. अशावेळी शेअर बाजाराची वाटचाल कशी असेल, जागतिक घडामोडींचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होईल, याचा अभ्यास करून योग्य मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते. या पार्श्वभूमीवर, एलजीटी वेल्थ इंडिया कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक जोहरा हाजियानी यांची ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार वसंत कुलकर्णी यांनी ‘सकाळ मनी’साठी घेतलेली खास मुलाखत...