
प्रसाद घारे
prasad.ghare@gmail.com
पुण्यातील मुंजाबाच्या बोळातील आपल्या घरात १९८८ मध्ये चेतन धारिया यांनी ३०० चौरस फूट जागेत स्प्रिंग बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. आज शिरवळ औद्योगिक वसाहतीत सुमारे ८० हजार चौरस फूट जागेवर त्यांची अनंत डिफेन्स सिस्टीम्स प्रा.लि. ही कंपनी दिमाखात उभी आहे. भारतीय लष्करातील रणगाड्यांचे विविध प्रकारचे सुटे भाग या कारखान्यात तयार होतात. महाराष्ट्राच्या औद्योगिक जडणघडणीत असंख्य छोट्या आणि मध्यम उद्योगांचे (एसएमई) बहुमोल असे योगदान आहे. त्यांपैकी एक असणाऱ्या चेतन धारिया यांचा प्रेरक जीवनप्रवास...