

The Power of Small Changes: How Carpooling Transformed Sumeet’s Monthly Budget
Sakal
डॉ. वीरेंद्र ताटके, गुंतवणूक विषयाचे अभ्यासक
पुण्यात हिंजवडी येथे नोकरीला असलेला सुमीत रोज आपल्या कारने ऑफिसला जात असे. ‘स्वतःची गाडी म्हणजे सोय,’ असे त्याचे ठाम मत होते. मात्र, या सोयीची किंमतही कमी नव्हती. पेट्रोलचा वाढता खर्च, ट्रॅफिकमधील वेळेचा अपव्यय आणि कंपनीच्या आवारात पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने ‘पे अँड पार्क’मध्ये कार लावावी लागत असल्याने त्याचा रोजचा खर्च यामुळे त्याचा मासिक खर्च मोठ्या प्रमाणात वाढत होता. एक दिवस पेट्रोल भरताना त्याने पंपावरील मीटरकडे पाहिले आणि त्याच्या मनात विचार आला, ‘‘आपण रोज किती पेट्रोल जाळतो आहोत?’’ त्या दिवशी त्याने खर्चाचा हिशेब मांडला आणि त्याला जाणवले, की एकट्याने प्रवास करणे हे सोयीपेक्षा अधिक खर्चिक ठरत आहे.