
ॲड. रोहित एरंडे - कायद्याचे जाणकार
नोकरी करणाऱ्यांसाठी आणि नोकरी देणाऱ्यांसाठी एम्प्लॉयमेंट बाँड (Employment Bond) हा नोकरीच्या उमेदवारीच्या (प्रोबेशन) काळातील मूलभूत आणि महत्त्वाचा करार असतो. यात कर्मचारी आणि मालक यांच्यात एका विशिष्ट कालावधीसाठी करार केला जातो, ज्यामध्ये कर्मचाऱ्याने ठरावीक कालावधीसाठी कंपनीमध्ये काम करणे आवश्यक असते आणि कंपनीही या काळात कर्मचाऱ्यावर ट्रेनिंग आदींसाठी मेहनत घेते, खर्च करते.