

Suzlon Energy financial turnaround
sakal
सुझलॉन एनर्जी या कंपनीची स्थापना तुलसी तांती यांनी १९९५ मध्ये पुण्यात केली. तांती यांच्या कापड व्यवसायाला लागणारा मोठा वीज खर्च आणि वीजपुरवठ्यातील व्यत्ययांमुळे त्यांना पवनऊर्जेकडे वळण्याची प्रेरणा मिळाली आणि जर्मन कंपनी ‘सुडविंड’शी टर्बाइन तंत्रज्ञानासाठी भागीदारी करून ते या क्षेत्रात उतरले.