

Swaraj Engines Share Analysis Stock Price at 3494 Rupees and Key Business Factors Investors Should Watch in the Market
sakal
-भूषण ओक, शेअर बाजार विश्लेषक
स्वराज इंजिन्स ही कंपनी १९८५ मध्ये किर्लोस्कर ऑइल इंजिन्स आणि पंजाब ट्रॅक्टर्स या कंपन्यांचा संयुक्त उपक्रम म्हणून स्थापन झाली. किर्लोस्कर कंपनीने सुरुवातीला इंजिननिर्मितीसाठी आवश्यक तंत्रज्ञान पुरवले. २००७ मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने ‘पंजाब ट्रॅक्टर्स’मध्ये मोठे भागभांडवल घेतले आणि २००९ मध्ये ही कंपनी महिंद्रामध्ये विलीन झाली. किर्लोस्कर इंडस्ट्रीजने २०२२ मध्ये उर्वरित १७.४१ टक्के भागभांडवल महिंद्राला विकले. त्यामुळे स्वराज इंजिन्स ही महिंद्राच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी झाली. ही कंपनी महिंद्राच्या स्वराज ट्रॅक्टर्स विभागासाठी २२ ते ६५ एचपी क्षमतेची डिझेल इंजिने आणि सुटे भाग पुरवते.