
वसंत कुलकर्णी - ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
टाटा मिड कॅप फंडाने एक जुलै २०२५ रोजी ३१ वर्षे पूर्ण केली. या फंडात पंधरा वर्षांपूर्वी (एक जुलै २०१० रोजी) गुंतविलेल्या एक लाख रुपयांचे २७ जून २०२५ रोजी गुंतवणूक मूल्य ९.९२ लाख रुपये होते आणि गुंतवणुकीवर वार्षिक १६.५४ टक्के दराने परतावा मिळविलेला आहे. दहा वर्षांपूर्वी (एक जुलै २०१५ रोजी) गुंतविलेल्या एक लाख रुपयांचे ११ जुलै २०२५ रोजी गुंतवणूक मूल्य १७ लाख ७९ हजार ६४१ रुपये होते आणि गुंतवणुकीवर वार्षिक १६.३३ टक्के दराने परतावा मिळविलेला आहे. मागील दहापैकी सात कॅलेंडर वर्षे या फंड गट सरासरीपेक्षा अधिक परतावा मिळविण्यात हा फंड यशस्वी झाला आहे.