
Parenting & Money: Building Financial Wisdom in Children, Preparing Kids for a Financially Stable Future
चकोर गांधी
chakorgandhi@gmail.com
मागच्या महिन्यात ‘फादर्स डे’ साजरा झाला. त्यानिमित्त वडील आणि मुलांमधील आर्थिक नाते कसे असावे? मुलांवर आर्थिक संस्कार कसे करावेत? अर्थकारणावरून परस्परांमधील नाते बिघडविण्याऐवजी ते अधिक दृढ कसे करावे, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्याविषयी माझे स्वतःचे अनुभव व विचार आणि आजूबाजूची परिस्थिती याचा घेतलेला हा आढावा...
पैशांची देवाणघेवाण म्हणजे अर्थकारण हे मुलांच्या वयाप्रमाणे ठरते. अगदी मुलांच्या जन्मापासून ते घडत असते. मूल जन्माला आल्यावर सर्वांचाच आनंद द्विगुणीत होतो. लहान मुलांसाठी अनेकदा महागडी खेळणी, कपडे, वस्तू आणल्या जातात. मात्र, लहान मुलांसाठी सर्व खेळणी सारखीच असतात.
त्यामुळे विनाकारण खूप महागडी खेळणी आणू नयेत. त्याऐवजी त्याचे पैसे बँकेत; तसेच ‘पीपीएफ’ खाते लवकरात लवकर सुरू करून त्यात पैसे टाकावेत.