Premium|RACI Matrix Framework : ‘तुम्ही-आम्ही दिवाळीचे फटाकेच ना राव!’

RACI Matrix Business Management : तेनाली रामनच्या मिश्कील संवादातून व्यवसायातील कर्मचारी जबाबदाऱ्या, कामाचे नियोजन आणि निर्णयप्रक्रिया समजून घेण्याची संधी मिळते. आरएसीआय मॅट्रिक्सच्या मदतीने संघातील कामकाजाचा गोंधळ कसा दूर करता येतो?
RACI Matrix Framework

RACI Matrix Framework

esakal

Updated on: 

प्रतीक डुंबरे - capsdumbre@gmail.com

तेनाली रामन- मध्ययुगीन इतिहासातील एक बुद्धिमान, मिश्कील आणि हजरजबाबी व्यक्तिमत्त्व! आजच्या एकविसाव्या शतकात एका काल्पनिक साम्राज्यातील हा तेनाली आपल्या महाराजांशी संवाद साधत व्यवसायातील काही महत्त्वाची रहस्ये उलगडतो; ‘तेनाली व्हॅल्यू फ्रेमवर्क’च्या माध्यमातून... आजचा विषय ‘आरएसीआय (RACI) मॅट्रिक्स’...

साम्राज्यात दिवाळीचे मंगलमय वातावरण होते. महाल, घरे, बाजारपेठा, रस्ते सगळे काही अक्षरशः फुलून गेले होते. तेनाली दरबारात सर्वांना कविता ऐकवत होता,

‘‘ठिणग्या उडवत पसरणाऱ्या पावसासारखं कोणी

कोणी भिरभिर चक्कर- स्वतःभोवतीच गातं गाणी

फुलबाजीच्या सारखं कोणी, पेटवून देणारं

कोणी सेवन शॉट- सातही सूर लावणारं

जितकं जास्त प्रदर्शन, तितकं मोठ्ठ नाव!

तुम्ही-आम्ही दिवाळीचे फटाकेच ना राव!!’’

‘‘व्वा तेनाली!’’ महाराजांनी दाद दिली. सगळे जण टाळ्या वाजवू लागले; पण मिस्टर संयमेश्वर शुन्यात बघत होते. महाराजांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यांनी लगेच विचारले, ‘‘काय मिस्टर संयमेश्वर, तुम्हाला नाही आवडली कविता?’’

‘‘तसं नाही महाराज, उलट ही कविता मला माझ्या फॅक्टरीमध्ये घेऊन गेली. तिथे मला रोज फुलबाज्या, पाऊस, भुईचक्कर यांना सांभाळून घ्यावे लागते.’’

महाराज आणि दरबारी मंडळी हसायला लागले. ‘‘अहो संयमेश्वर, म्हणजे तुम्हाला तुमच्या कर्मचारीरूपी फटाक्यांचा त्रास आहे तर!’’

Loading content, please wait...