

DPDP Act 2023
esakal
आपली वैयक्तिक माहिती आपण बऱ्याच वेळा डिजिटल माध्यमांवर देत असतो. या माहितीचे पुरेसे संरक्षण होईल, अशी आपली अपेक्षा असते. मात्र, अनेकदा या अपेक्षांचा भंग होतो. या संदर्भात दाद मागण्यासाठी, तसेच जबाबदाऱ्या निश्चित करण्यासाठी विशिष्ट चौकटीची, कायद्याची गरज होती. ती आता पूर्ण झाली आहे. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अॅक्टची सविस्तर माहिती...
‘डेटा हे नव्या काळातील खनिज तेल आहे’ हे विधान ब्रिटीश गणितज्ञ क्लाईव्ह हम्बी यांनी २००६ मध्ये पहिल्यांदा केले. त्यावेळी त्यांच्या मते, खनिज तेलाच्या उपलब्धतेने ज्या प्रकारे औद्योगिक क्रांतीला गती मिळाली, त्याचप्रमाणे नव्या काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर आधारित सेवा क्षेत्रात डेटा हा अतिशय महत्त्वाचा कच्चा माल ठरणार होता. खनिज तेलाप्रमाणेच कच्च्या डेटावर प्रक्रिया केल्याशिवाय हा डेटा उपयुक्त ठरत नाही. मात्र, गरजेनुसार उपलब्ध डेटाचे विश्लेषण करून त्याची फेररचना केल्यास त्यातून अनेक कृतीयोग्य निष्कर्ष निघतात. हम्बी यांचे हे विधान त्या काळच्या परिस्थितीत अतिशय चपखल बसल्याने माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात सहजपणे वापरले जाऊ लागले.