US dollar strengthening : डॉलरची ताकद आणि रुपयाची घसरण

Impact of US dollar strengthening on Indian rupee : अमेरिकेतील उच्च व्याजदर, डॉलरची जागतिक वर्चस्व आणि भारताच्या व्यापार तुटीमुळे रुपया डॉलरविरुद्ध कमजोर होत आहे. यामुळे भारतीय शेअर बाजारात परकीय गुंतवणूकदारांची विक्री वाढते, आयातदार कंपन्यांचा खर्च वाढतो, आणि महागाईचे संकट उद्भवते.
US dollar strengthening

US dollar strengthening

sakal

Updated on

गौरव बोरा- शेअर बाजार विश्‍लेषक

अलीकडच्या काळात अमेरिकी डॉलर सतत मजबूत होताना दिसत आहे, तर आपला रुपया त्याच्याविरुद्ध कमकुवत होत आहे. अनेकांना प्रश्न पडतो, की डॉलर फक्त रुपयाविरुद्धच वाढतो आहे का? प्रत्यक्षात डॉलर अनेक चलनांविरुद्ध मजबूत आहे, पण रुपयावर त्याचा परिणाम अधिक तीव्र जाणवतो. यामागील कारणे समजून घेणे महत्त्वाचे आहे-

१. सर्वांत मोठे कारण म्हणजे अमेरिकेतील उच्च व्याजदर. अमेरिकेत व्याजदर जास्त असल्याने जागतिक गुंतवणूकदारांना सुरक्षित आणि निश्चित परतावा मिळतो. त्यामुळे ते अमेरिकी सरकारी रोखे आणि डॉलरमधील गुंतवणुकीकडे वळतात. डॉलरची मागणी वाढली, की तो मजबूत होतो. जगात अस्थिरता, युद्धसदृश परिस्थिती किंवा आर्थिक मंदीची भीती वाढली, की गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधतात आणि डॉलरला सुरक्षित आश्रय मानले जाते.

२. डॉलरची आणखी एक ताकद म्हणजे जागतिक व्यापारातील त्याचे वर्चस्व. कच्चे तेल आणि अनेक महत्त्वाच्या वस्तूंची देवाणघेवाण डॉलरमध्येच होते. त्यामुळे डॉलरची मागणी नैसर्गिकरित्या कायम राहते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com