
अप्पासाहेब हत्ताळे
सोलापूर: एक नोव्हेंबर २००५ पूर्वी पदभरतीची जाहिरात निघून, त्यानंतर नियुक्ती मिळालेल्या जिल्ह्यातील १४९ उपशिक्षकांना जुनी पेन्शन लागू झाली आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे जुन्या पेन्शनपासून वंचित शिक्षकांना म्हातारपणी आधार मिळणार आहे.