

Financial Independence
sakal
प्रजासत्ताकम्हणजे स्वयंशासन अर्थात आपलेच आपल्यावरचे नियंत्रण! हा दिवस आपल्याला आपल्या हक्कांची आणि त्याचबरोबर आणि कर्तव्यांची आठवण करून देतो. कोणतेही हक्क उपभोगण्याआधी आपण आपली कर्तव्ये नीट पार पाडायला हवीत. व्यक्तिगत आयुष्यातदेखील जेव्हा आपण आपल्या पैशांवर नियंत्रण ठेवतो, जबाबदारीने खर्च करतो आणि भविष्यासाठी सज्ज राहतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने वैयक्तिक आर्थिक प्रजासत्ताक अस्तित्वात येते. अर्थात, या आर्थिक प्रजासत्ताकासाठी म्हणजेच स्वातंत्र्यासाठी काही ठोस संकल्प घेणे अत्यंत गरजेचे आहे. वरवर पाहता पुढील पाच संकल्प छोटे वाटतील; पण दीर्घकाळात हेच खूप प्रभावी ठरू शकतील.